Pik Vima : पिक विमा रक्कम

Pik Vima

Pik Vima

खरीप हंगाम पिक विमा रक्कम

महाराष्ट्र राज्यात पडलेल्या दुष्काळ मुळे राज्यातील सर्वच शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे.शेतकऱ्यांनी खरीप हंगाम साठी पेरण्या केल्या होत्या परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शेतकरी आता पिक विमा रक्कम साठी प्रतीक्षेत आहे.आता पिकांनुसार शेतकऱ्यांना ८५००-२२५०० पर्यंत मदत दिली जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहू.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनाने नुकताच राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ ट्रिगर २ लागू करून या तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देखील देण्यात येणार आहे.राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.ट्रिगर २ लागू केल्याने आता अग्रीम पिकविम्याचे पैसे शेकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहेत.यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला असावा आणि सोबतच आपल्या पिकाची ई पिक पाहणी नोंद देखील केलेली असावी.

योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०२३
विभाग महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग
लाभ रक्कम सरसकट हेक्टरी मदत
लाभार्थी दुष्काळग्रस्त शेतकरी
वर्ष २०२३

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिक विम्याचे पैसे जमा केले जातील असे कृषी मंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे.शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकार तातडीने पावले उचलत असल्याचे पहायला मिळत आहे.आणि त्यामुळेच आता परीक्षण करून राज्यातील 43 तालुक्यांत दुष्काळ परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कोणती आहेत पिके जाणून घ्या 

 

कोणते  समाविष्ट तालुके 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!