Pradhan Mantri Awas yojana 2023.प्रधान मंत्री  आवास योजना

Pradhan Mantri Awas yojana 2023.

प्रधान मंत्री  आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.

  • ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
  • योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
  • वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
  • सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.
  • सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
  • लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.
  • घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
  • स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.

प्रधानमंत्री आवास योजना 2023 अंतर्गत अर्जासाठी लाभार्थी पात्रता

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!