Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 : yes

https://news.maharashtrayojana.com/mahatma-fule-arogya-yojana/

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

 

 

हि महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना गरजेच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या योजनांव्दारे शासन करत असते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: नवीन अपडेट्स (28 जून 2023)

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023: राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जाहीर केलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आहे, जी सर्वसामान्यांसाठी सर्वात ‘निरोगी’ योजना आहे. आता या योजनेतून पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य खासगी रुग्णालयांमध्ये लाखोंची बिले भरण्याऐवजी या योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार घेता येणार आहेत. जन आरोग्य योजनेचे विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय प्रोसिजर्स :- या योजनेमध्ये पूर्वीच्या 971 वैद्यकीय प्रोसिजर्स पैकी अत्यंत कमी वापर असलेल्या प्रोसिजर्स वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रोसिजार्सचा समावेश करण्यात आलेला आहे. या मध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार (Hip & Knee Replacement), सिकलसेल, अनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, इत्यादी साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्तविकार शास्त्र या विशेषज्ञ सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100 प्रोसिजार्सचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला असून या मध्ये 127 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकरिता राखीव ठेवण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नि:शुल्क उपचार सेवा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!