rummy star

भरघोस उत्पन्न आणि किडीचा प्रभावही नाही..

कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात ओमकार एक नवी जात विकसित केली आहे .

संकरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे ओमकार ही जात तयार करण्यात आली आहे. या नवीन जातीमुळे प्रति हेक्टर 39 क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन मिळण्याची गॅरंटी आहे . सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बंपर उत्पादन देण्याबरोबरच ही जात गर्डल बीटल, लीफ मायनर, लीफ रोलर, स्टेम फ्लाय, ऍफिड्स, व्हाईट फ्लाय आणि डिफोलिएटर यांसारख्या धोकादायक कीटकांवरही फायदेशीर ठरते.

ओमकार वाणावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होता, दाणे भरणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. म्हणून प्रतिकूल वर्षात विक्रमी उत्पादन देणारे वाण ठरलं आहे.

ओमकार जातीला पेरणीपासून फुलोऱ्यापर्यंत 43 दिवस लागतात, तर पेरणीपासून पीक पक्व होण्यासाठी एकूण 104 दिवस लागतात. त्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो..

ओमकाराचा पेरणीसाठी खर्च कमी आणि नफा कितीतरी पटीने जास्त..

ओमकार जातीच्या सोयाबीनमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असून ते दही, गुलाब जामुन, आइस्क्रीम, चीज बनवण्यासाठी प्रक्रिया करून त्याचा वापर देखील करू शकता. शेतकरी हे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात वापरत असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. ओमकार सोयाबीनची एक एकर लागवड करण्यासाठी 30 हजार रुपये खर्च येतो, तर नफा 2 लाख रुपये आहे.

त्याच्या हिरव्या शेंगा पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. यानंतर या सोयाबीनच्या आणखी दोन तोडणी आहेत. पचण्याजोगे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि आवश्यक फॅटी ऍसिडस्, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, झिंक, थायामिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई, आहारातील फायबर आणि साखर या जातीमध्ये आढळतात..

सोयाबीनपासून शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक आयडिया…..

ओमकारच्या हिरव्या शेंगा फायदेशीर असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तुम्ही ते सुकवूनही विकू शकता. सुक्या बियापासूनही सोया चीज बनवता येते. एक किलो बियाण्यापासून अडीच किलो पनीर मिळू शकते, ओमकारच्या सोयाबीनपासून एक क्विंटलपासून 225 किलो सोया चीज तयार करण्यासाठी 13 हजार रुपये खर्च येतो, तर 225 किलो सोया चीजच्या विक्रीतून 54 हजार 500 रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो.

error: Content is protected !!