Money transfer without internet : इंटरनेट शिवाय पैसे पाठवू शकता

Money transfer without internet

Money transfer without internet 2023

इंटरनेट शिवाय पैसे पाठवू शकता

आजकालच्या काळामध्ये  आपण सर्वच यूपीआय (UPI) पेमेंट म्हणजेच ऑनलाइन पेमेंट पाठवत असतो परंतु ऑनलाईन पेमेंट करताना रेंज नसेल किंवा सर्वर डाऊन असेल, किंवा पेंडिंग प्रोसेस यामुळे आपल्याला फारच मनस्ताप सहन करावा लागतो.परंतु आता आरबीआयच्या (RBI)  चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीमध्ये यूपीआय (UPI) म्हणजेच ऑनलाइन पेमेंट संबंधित बरेचसे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत.यामध्ये  UPI Lite मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

Money transfer without internet

त्याचबरोबर लवकरच ऑफलाइन पेमेंट सुविधा देखील  होणार आहे

आरबीआय ने आता यूपीआय लाईट (UPI Lite ) वरील व्यवहार मर्यादा 200 रुपयावरून 500 रुपये केले असून याचा निर्णय चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत झालेला आहे. या विषयावर आरबीआय(RBI) गव्हर्नर शशिकांत दास म्हणाले की डिजिटल पेमेंट संबधीची क्षमता वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण,

आम्ही सांगतो की यूपीआय लाईट  (UPI Lite) हे  पहिल्यांदा सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलेले होते. या सुविधेद्वारे आपण इंटरनेट शिवाय ऑफलाइन पेमेंटचे व्यवहार करू शकतो सुरुवातीला ही सुविधा मर्यादित होती, परंतु आत्ताच्या बैठकीमध्ये लवकरच ही सुविधा गुगल पे (Gpay), फोन पे (phone pay), पेटीएम (paytm) या सारख्या यूपीआय (UPI)  सर्विस देणाऱ्या एप्लीकेशन वरती पण सुरू होणार आहे.आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी सांगितल्यानुसार ऑफलाइन मोडमध्ये यूपीआय लाईट  (UPI Lite) व्यवहार मर्यादा 200 रुपये  वरून 500 रुपये करण्यात आलेली आहे. त्याची वॉलेट मर्यादा सुद्धा आदीप्रमाणे 2000 रुपयेच असणार आहे .या निर्णय द्वारे आपण इंटरनेट शिवाय 500 रुपये पर्यंत पेमेंट ऑफलाइन पाठवू शकतो.Money transfer without internet

आरबीआय ने यूपीआय लाईट  (UPI Lite) ऑन डिवाइस वॉलेट द्वारे नियर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानाचा वापर करून यूपीआय वर ऑफलाइन पेमेंट सक्सेसफुल केल्याची घोषणा केली असून, या सुविधेद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल तरी देखील 500 रुपये पर्यंत पेमेंट करू शकणार आहेत.

Money transfer without internet

Near-field communication (NFC)

तर जाणून घेऊयात एन एफ सी (NFC) तंत्रज्ञान काय आहे ?

बद्दल माहिती सांगायची तर आपलं डेबिट कार्ड ज्यावेळेस आपण एखादी शॉपिंग केली किंवा पेट्रोल पंपा वरती जातो आणि पेमेंट करताना  स्वॅप न करता सुद्धा मशीनच्या जवळ नेऊन टच केले की त्याद्वारे पेमेंट होते अशाच पद्धतीने या  तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. यासाठी आपल्याला (NFC) मोबाईल मध्ये एप्लीकेशन लोड करायचा आहे. आणि यामध्ये आपल्या कार्डसंबंधीची माहिती साठवून ठेवायची आहे ज्यावेळेस आपण एखाद्याला पेमेंट करणे, शॉपिंग पेमेंट करायचे असेल तेव्हा कार्ड न वापरता आपण आपल्या फोन चा  कार्ड सारखाच वापर  करू शकतो परंतु याची मर्यादा आरबीआयने (RBI) एका वेळेस 500 रुपये  ठेवलेली आहे.Money transfer without internet

माहिती आवडल्यास पुढे share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!