3 patti real money app

 ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ॲग्रिकल्चरल को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) आणि नॅशनल कन्झुमर को – ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीसीएफ ) या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून तातडीने भाव आटोक्यात आणण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

त्याकरिता जेथे कांद्याची दरवाढ झालेली आहे अशा राज्यांत बफर स्टॉकमधील कांदा 25 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रति किलोवरून शुक्रवारी 47 रुपये प्रतिकिलो झाली.

दिल्लीमध्ये किरकोळ किंमत 40 रुपये प्रतिकिलो झाली असून वर्षभरापूर्वी ती याच कालावधीत 30 रुपये प्रतिकिलो होती. ऑगस्टच्या मध्यापासून ‘बफर स्टॉक’मधून कांद्याचा पुरवठा करत आहोत आणि किमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत आहोत, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंग यांनी सांगितले.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये ‘बफर स्टॉक’मधून कांद्याचा पुरवठा केला जात आहे. ऑगस्टच्या मध्यापासून सुमारे 1.7 लाख टन कांद्याचा ‘बफर स्टॉक’मधून 22 राज्यांमध्ये विविध ठिकाणी पुरवठा करण्यात आला.

आता प्रश्न हाच पडतो कि सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे कि ग्राहकांची ,परंतु सरकारने दोघांची काळजी केली पाहिजे हीच अपेक्षा ….?

error: Content is protected !!