rummyculture app download

कुठल्या कारणासाठी लागते जात वैधता प्रमाणपत्र

  • १.जातीय आरक्षित जागेवर निवडणूक लढवण्यासाठी
  • कोणत्याही जातीय आरक्षित जागेकरता निवडणूक लढवण्यासाठी जात वैध्यता प्रमाणपत्राची अवश्यकता असते,परंतु जात वैध्यते साठीचा अर्ज पण निवडणूक लढवण्यासाठी ग्राह्य धरला जातो.निवडून आलेनंतर 6(सहा)महिनेच्या आत होती परंतु आता मुदत वाढवून  १२ महिन्याच्या आत  जात वैद्यता प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सदर करणे गरजेचे असते.
  • २.विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील प्रवेशा साठी 
  • तसेच ,अनुसूचित जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमासाठी आरक्षण प्राप्त करण्यासाठी किंवा आरक्षण असलेल्या त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.जातीच्या प्रमाणपत्रासोबतच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून केली जात आहे, यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जातीचा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळवून घेणे हि आवश्यक आहे.
  • ३.आरक्षित जागेच्या नोकरी करता
  • आरक्षित जागेच्या नोकरी करता जात प्रमाणपत्र शिवाय जात वैध्यता प्रमाणपत्राची अवश्यकता असते.
  • जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापना केली आहे. अर्जदार/मागासवर्गीय विद्यार्थी विविध ठिकाणी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आपला प्रस्ताव या समितीकडे सादर करावा लागतो.
    जात पडताळणी समिती आपल्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी करून आपल्याला किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किंवा अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्र देते.

जात वैध्यता प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे पहा

error: Content is protected !!