pimpalgaon onion market rate today:कांद्याचे भाव कमी करताय का सरकार….?

pimpalgaon onion market rate today

कांद्याच्या दराने गेल्या काही दिवसांत मोठीच उडी घेतली आहे. कांद्याच्या राष्ट्रीय सरासरी किरकोळ भावात तब्बल 57 टक्क्यांनी वाढ होऊन प्रतिकिलो भाव 47 रुपयांवर गेला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यान पन्नाशी(50) गाठला आहे. 

कांद्याचे भाव का वाढले ?

यंदा हवामानाशी संबंधित कारणामुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरू व्हायला हवी होती, मात्र, तसे झाले नाही. त्यातच साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्यामुळे पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.

कांद्याने गाठली पन्नाशी(50)..

राज्यात एपीएमसी(APMC) बाजारात एक नंबरच्या चांगल्या कांद्याला किलोमागे 55 रुपयांचा भाव मिळाला आहे. कांद्याचे उत्पादन पाहता दर आता वाढतच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. नेहमी घाऊक बाजारात कांद्याच्या 150ते 200गाड्या येत असतात.

आता फक्त 70 ते 80 गाड्या येत आहेत, अशी माहिती व्यापारी मनोहर शेठ यांनी दिली. घाऊक बाजारात गेल्या काही महिन्यांपासून उत्तम दर्जाचा नंबर एकचा कांदा केवळ 15 ते २०  टक्केच येत आहे. त्यामुळे या कांद्याला 50 ते 55 रुपये दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक नंबरचा कांदा ६०-७० रुपये किलो झाला आहे.

सरकारने केला दुप्पट बफर स्टॉक

केंद्र सरकारने चालू वर्ष 2023-24 मध्ये कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट केला आहे. यामुळे देशांतर्गत उपलब्धता सुधारेल आणि आगामी काळात वाढत्या किमतींना आळा बसेल. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. येत्या काही दिवसांत अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आहे.

कांद्याचे बाजारभाव कमी का होतील ते पहा ..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!